प्लाझमा देण्यासाठी लोकांनी पुढे यावं – उदय सामंत

रत्नागिरी – गणेशोत्सव आणि बकरी ईद कलम 144 च्या अटी व शर्तीच्या अधीन राहून साजरं करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याबद्दलची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की,

पाच जणांची समिती स्थापून शासन व मंदिरातील प्रमुखांमध्ये समन्वय साधला जाईल. त्याचप्रमाणे ईद उल अदहा रमजान ईद प्रमाणेच साधेपणाने साजरी केली जाईल असं आश्वासन संबंधितांनी दिलं आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या अटी व शर्ती अधीन राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन सर्वांनी दिलं आहे.

उदय सामंत – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

आर्सेनिक अल्बमचा टप्पा 2 लवकरच

आर्सेनिक अल्बम गोळ्यांचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी आवश्यक औषधं उपलब्ध करून दिलेल्या तारखेपूर्वी वाटप करण्याचे आदेश आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले.

आशा वर्कर्सना रेनकोट मिळणार

रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. तसेच अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर आरोग्य सर्वेक्षण करीत आहेत. त्यांना पावसाळ्यात सर्वेक्षण सुरू ठेवण्यासाठी रेनकोटची गरज आहे. नियोजन निधीतून अथवा कोविडच्या निधीतून सदर खरेदी करून त्वरित वाटप करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत देण्यात आल्या आहेत.

प्लाझमा देण्यासाठी लोकांनी पुढे यावं

प्लाझमा थेरपीसाठी प्रशिक्षण झालेले आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री लवकरच रूग्णालयात येईल. जिल्ह्यात 600 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. प्लाझमा थेरपीच्या माध्यमातून बरे झालेले रुग्णांची प्लाझ्मा वापरून कोरोना रुग्णांना बरे करणे शक्य आहे. त्यामुळे अशा बरे झालेल्या रुग्णाने यासाठी पुढे यावे, असे आवाहन उदय सामंत यांनी केले आहे. वैयक्तिक भेट देऊन याबाबत कौन्सिलिंग करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*