दापोलीत घरगुती हिंसाचार प्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

दापोली : विवाहितेचा छळ, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुदस्सर शाबुद्दीन चिपळुणकर (पती, २१), शहाबुद्दीन जाफर चिपळुणकर (वय ७०), फिरोजा शाबुद्दीन चिपळुणकर (५८), सबा शाबुद्दीन चिपळुणकर (१९, सर्व रा. नशेमन कॉलनी दापोली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दरम्यान पीडित महिला माहेरी चिपळुण येथे गेल्या होत्या. त्या कारणावरून सासरच्या लोकांनी राग धरून एकमेकांचे संगनमताने तिला शिवीगाळ आणि दमदाटी केली.

हाताच्या थापटाने मारहाण करून ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली.

त्यांना घरातील बेडरूममध्ये कोंडून ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांना बाहेर पडणे कठीण होते.

त्यावेळी पतीने रात्री १२.३० वा. च्या सुमारास पैसे मागून पीडितेला मारहाण करण्यास सुरुवात केली.

तेव्हा त्याने म्हटले की, माझ्या प्रॉपर्टी पेपरवर सही कर व तु निघुन जा.

सही करण्यास नकार दिला तेव्हा त्याने मला बेडरुमध्ये बंद करुन तो निघुन गेला, असं तक्रारदार महिलेनं म्हटलं आहे.

सकाळी ०९.३० वा. चे सुमारास त्यांच्या पतीने येऊन बेडरुमचा दरवाजा उघडला व परत मारहाण करू लागला. तसेच सासु बेडरुम मध्ये आली तिने ही प्रॉपर्टी पेपरवर सही कर असे म्हणुन पीडितेच्या कानाखाली मारली तसेच पाण्याच्या रिकाम्या बॉटली फेकुन मारली.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात 4 जणांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*