दापोली : चार दिवसांपूर्वी दापोली तालुक्यातील टाळसुरे येथील चौदा वर्षीय मुलाच्या अपहरणाची बातमी आली आणि एकच खळबळ माजली. पोलीसांनी 13 सप्टेंबर रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. हा मुलगा सापडल्यानं खैरे कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
दापोली पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दापोली पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवान तपासाला सुरूवात झाली.
पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव, पोलीस शिपाई सुहास पाटील, पोलीस शिपाई विरेंद्र सातर्डेकर यांनी अतिशय बारीक तपास करून रूपेश खैरेचा ठिकाणा मिळवला.
त्यानंतर 16 सप्टेंबर रोजी ठाण्यात जाऊन रूपेशला शोधून ताब्यात घेतलं. तातडीनं दापोली पोलीसांनी त्याला दापोलीत आणलं.
दरम्यान, पोलीस तपासात त्याचे अपहरण झाले नव्हते तर तो स्वतःहून घरातून निघून गेल्याचे समोर आले आहे.
रूपेशला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती दापोली पोलीसातील सूत्रांनी दिली आहे.