दापोली वकील संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध जाहीर; ॲड. महेश सागवेकर अध्यक्षपदी!

दापोली वकील संघटनेच्या (Dapoli Bar Association) सन फेब्रुवारी २०२६ ते फेब्रुवारी २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठीच्या नूतन कार्यकारिणीची निवड आज बिनविरोध घोषित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी ॲड. महेश मोहन सागवेकर यांची, तर सचिवपदी ॲड. सचिन शरदचंद्र गद्रे यांची निवड करण्यात आली आहे.


वकील संघटनेच्या ११ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, महिला प्रतिनिधी आणि ५ सदस्य अशा एकूण ११ पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे कोणाचाही विरोधी अर्ज नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संपूर्ण पॅनलची निवड बिनविरोध झाल्याचे आज (दि. २१) अधिकृतरीत्या जाहीर केले.


नवनिर्वाचित कार्यकारिणी खालीलप्रमाणे:

  • अध्यक्ष: ॲड. महेश मोहन सागवेकर
  • उपाध्यक्ष: ॲड. ऋषिकेश नंदकिशोर भागवत
  • सचिव: ॲड. सचिन शरदचंद्र गद्रे
  • सहसचिव: ॲड. प्रथमेश विजय भोसले
  • खजिनदार: ॲड. योगेश विष्णू दांडेकर
  • महिला प्रतिनिधी: ॲड. साक्षी वैभव कदम
  • सदस्य: ॲड. मनिषा अजित जोशी
  • सदस्य: ॲड. रत्ना गजानन पडियार
  • सदस्य: ॲड. प्रशांत चंद्रकांत हेदुकर
  • सदस्य: ॲड. महेंद्र काशिराम बद्रे
  • सदस्य: ॲड. प्रणित बाळकृष्ण रहाटे

ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. विश्वास वसंत शिगवण, ॲड. मिलिंद अरविंद तांबे आणि ॲड. नितीन सुभाष सावंत यांनी काम पाहिले. या बिनविरोध निवडीबद्दल नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*