शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

क्रेडाई रत्नागिरीच्या ‘वास्तुरंग’ प्रदर्शनाचे आज उद्घाटन

क्रेडाई रत्नागिरीच्या ‘वास्तुरंग’ प्रदर्शनाचे आज उद्घाटन

रत्नागिरी : कोकणातील निसर्गरम्य वातावरणात स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी क्रेडाई रत्नागिरीतर्फे आयोजित ‘वास्तुरंग कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन २०२६’ चे आज (शुक्रवार) उद्घाटन दुपारी 4 वाजता होणार आहे. पालकमंत्री तथा उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचन उद्घाटन होणार आहे.

यावेळी आमदार किरण उर्फ भय्या सामंत, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलिस अधीक्षक नितीन बागाटे आदी उपस्थित राहणार आहेत.

साळवी स्टॉप येथील शासकीय जलतरण तलावाजवळील मैदानावर हे सातवे कोकण प्रॉपर्टी एक्स्पो २३ ते २६ जानेवारी दरम्यान भरले जाणार आहे. क्रेडाई रत्नागिरीचे अध्यक्ष महेश गुंदेचा यांनी सांगितले की, हे कोकणातील सर्वात मोठे वास्तू प्रदर्शन असून, गृहस्वप्न पूर्तीची उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एकाच छताखाली ग्राहकांना असंख्य पर्याय उपलब्ध होणे. रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित बिल्डर्स व डेव्हलपर्सचे १-२ बीएचके फ्लॅट्स, आलिशान बंगले, रो-हाउसेस तसेच गुंतवणुकीसाठी एन.ए. प्लॉट्सचे विविध प्रकल्प येथे सादर केले जातील. सर्व प्रकल्प महारेरा नोंदणीकृत असल्याने ग्राहकांना पूर्ण पारदर्शकता आणि विश्वासार्हता मिळेल.

फक्त घरांचे पर्यायच नव्हे, तर गृहखरेदीसाठी आवश्यक अर्थसहाय्यासाठीही सोय उपलब्ध आहे. विविध नामांकित बँकांचे स्टॉल्स प्रदर्शनात लावले जाणार असून, ग्राहक तेथेच कर्ज पात्रता तपासून गृहकर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती घेऊ शकतात.

या प्रदर्शनाला कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराची निवड करावी, असे आवाहन क्रेडाई रत्नागिरीतर्फे करण्यात आले आहे.

CREDAI Ratnagiri, Home Loans, Konkan Property Expo, MahaRERA, Property Exhibition, ratnagiri news, Real Estate Ratnagiri, uday samant, Vasturang 2026, उदय सामंत, कोकण प्रॉपर्टी एक्स्पो, क्रेडाई रत्नागिरी, गृहकर्ज, प्रॉपर्टी प्रदर्शन, महारेरा, रत्नागिरी बातम्या, रिअल इस्टेट रत्नागिरी, वास्तुरंग २०२६

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *