रत्नागिरी दि.6- येणाऱ्या काळात गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात येत आहेत . यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून नव्याने बांधलेल्या महिला रुग्णालयात (उद्यमनगर) 75 बेडचे व्यवस्था असणारे कोव्हीड रुग्णालयात तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या ठिकाणी 20 बेडची आयसीयू देखील असेल व 66 रुग्णांसाठी बेडनिहाय ऑक्सीजन लाईन देखील राहणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी कळविले आहे.
oxygen line
याचे उद्घाटन उद्या शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे.