रत्नागिरीत कोव्हीड प्रोटेक्शन शॉप

Cov

 

रत्नागिरी : दि. ०९ जुलै २०२० पासून के.सी.जैन नगर, मारुती मंदिर,रत्नागिरी येथे कोव्हीड प्रोटेक्शन शॉप सुरू होत आहे. या द्वारे सध्या वेगाने पसरत असलेल्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी लागणाऱ्या विविध गरजेच्या गोष्टी एकाच छताखाली मिळणार आहेत.

हे शॉप सुरू करण्यासाठी अमित नागवेकर यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोजच्या वापराच्या अनेक गोष्टी जसे, ओरिजिनल N95 मास्क, डीस्पोजेबल/री-युजेबल मास्क, सॅनिटाईझर, डिसीनफेक्टन्ट, हँडवॉश, ग्लोव्हज, हॉस्पिटल किंवा होम Quarantine व्यक्तींसाठी लागणारे डीस्पोजेबल बेडशीट, थर्मो गन रत्नागिरीकरांसाठी योग्य व उत्कृष्ट क्वालिटी तसेच कमीत कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कोरोनाचे संक्रमण आता स्थानिक पातळीवर वाढत चालले असून प्रत्येक व्यक्तीने आता स्वतःची तसेच स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेणे गरजेचे झाले आहे. चुकीचे किंवा खालच्या दर्जाचे चायनीज मास्कपासून सावध व्हा आणि खात्रीपूर्वक अँटी कोरोना प्रोडक्ट रत्नागिरीतील कोव्हीड प्रोटेक्शन शॉप मधूनच घ्या. अमित नागवेकर म्हणतात,


अमित नागवेकर

या शॉप मधून वस्तू घेतल्याचा मुख्य फायदा म्हणजे ग्राहकांची पिळवणूक न करता स्वस्त दरात ओरिजिनल प्रॉडक्ट मिळू शकणार. आणि हो, अटी-शर्तींसह आपल्याला घरी किंवा ऑफिसमध्ये डिलिव्हरी देण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येईल. तुम्ही मला 9604010101 या क्रमांकावर संपर्क करू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*