रत्नागिरी : कोरोनाची लस देण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरु झाली आहे. सुरूवातीला कोरोना वॉरियर्सना लस दिली आहे.

याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ईंदुराणी जाखड आणि निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाढ यांनी कोरोनावरील लस घेतली.

कोरोना लस सुरक्षित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. आता हळूहळू पुढील टप्प्यात नागरिकांनाही लस दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.