पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 449 बरे झालेले रुग्ण 334
 
रत्नागिरी (जि.मा.का.) दि. 17 आज सायंकाळपर्यंत  प्राप्त अहवालात 04 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 449 आहे.  दिवसभरात 09 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

आत्तापर्यंत 17 मृत्यू झालले असून आता ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 98 इतकी आहे.  दिवसभरात कोव्हीड केअर सेंटर घरडा लोटे 5 व कोव्हीड केअर सेंटर कृषि विद्यापीठ दापोली येथील 4 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

आज सकाळपर्यंतचे 4 पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण
दापोली -1
रत्नागिरी -2
देवरुख -1

आज सायंकाळपर्यंतची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह       -449
बरे झालेले                -334
मृत्यू                           -17

ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह     -98

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन.
जिल्ह्यात सध्या 30 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 3 गावांमध्ये,  

गुहागर तालुक्यामध्ये   01, 

खेड तालुक्यात 04 गावांमध्ये, 

संगमेश्वर तालुक्यात 02,  

दापोली मध्ये 05 गावांमध्ये, 

लांजा तालुक्यात 01, 

चिपळूण तालुक्यात 06  गावांमध्ये

राजापूर तालुक्यात 06 आणि

मंडणगड मधील 02 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरण

संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी –  17, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी –  3, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा इन्स्टीटयुट, लवेल, खेड –  7, उपजिल्हा रुग्णालय गुहागर-2,  कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – 9, कोव्हीड केअर सेंटर साडवली संगमेश्वर -3  असे एकूण 43 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वारंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून  आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 46 हजार 610   इतकी आहे.
आत्तापर्यंत 7 हजार पेक्षा जास्त अहवाल निगेटिव्ह.
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 7 हजार 872 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 7 हजार 537 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 449 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 7 हजार 68 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 335 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.   335 प्रलंबित अहवालमध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे, 216 अहवाल मिरज आणि 115 अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि.  16 जुन 2020 अखेर एकूण 1 लाख 38 हजार 520 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 66 हजार 809 आहे.