दापोली (सुयोग वैद्य) : दाभोळमधील एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाल्यानं परिसरात चिंता वाढली आहे. त्यामुळे दाभोळ ग्रामपंचायतीने 12 जुलैपर्यंत सर्व दुकानं बंद ठेवण्याच्या सुचना केल्या आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी फक्त मेडिकल आणि खाजगी रूग्णालये सकाळी ९ ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहतील अशी माहिती ग्रामपंचायतीनं दिली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी खेळणं आणि पोहणं यावरही बंदी असणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणं बंधनकारक आहे. फिजिकल डिस्टंसिंग ठेवणंही अनिवार्य आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती ग्रामपंचायतीनं दिली आहे.

दाभोळमध्ये सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णाची लक्षणे कम्युनिटी स्प्रेडची असल्यानं ती रोखण्यासाठी सर्व दाभोळकरांनी सहकार्य करावे असं आवाहनही दाभोळ सरपंचांनी केलं आहे.