रत्नागिरी : सिंधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत रत्नागिरीतील आंबा उत्पादकांसाठी पणन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या कुलिंग व्हॅनचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले.

यावेळी त्यांनी स्वत: व्हॅन चालवून पाहणी केली. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना सोबत घेऊन त्यांनी व्हॅन काही अंतर चालवली.

ही व्हॅन आंबा वाहतुकीसाठी उपयुक्त ठरेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यास मदत करेल. रत्नागिरीच्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे डॉ. सामंत यांनी यावेळी सांगितले.