रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या क्षेत्रास कोरोना विषाणू बाधित क्षेत्र घोषित करण्यात येतं. अशा विषाणू बाधित क्षेत्र अर्थात कन्टेनमेंट झोनची संख्या आता 30 आहे. यात सर्वाधिक चिपळूण तालुक्यात 12 आहेत. एकूण 48 पैकी 18 गावांचा 14 दिवसांचा कालावधी आज संपला आहे.
या कन्टेनमेंट झोन मध्ये 48 ठिकाणी एकूण 4309 घरे असून 16991 नागरिक या क्षेत्रात आहेत. 92 आरोग्य पथकामार्फत या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यानंतर ही संख्या आता घटताना दिसत आहे.
सुरुवातीला 130पर्यंत असणारी कन्टेनमेंट झोनची संख्या आता जवळपास 80 ने कमी झाली आहे तथापि नव्या क्षेत्रात रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास तेथे या स्वरूपाचे क्षेत्र घोषित करण्यात येत असते.
जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. आज याची टक्केवारी 69% आहे तर होम क्वॉरंटाईन खाली असलेल्या व इतर जिल्ह्यातून आलेल्या सुमारे 80 हजार नागरिकांचा 14 दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी संपला आहे.
जिल्ह्यात कोरोना चा पहिला रुग्ण आढळल्या पासून जिल्हा कोरोना शून्य स्थितीत पोहोचला होता. मात्र मुंबई आणि पुण्यासारख्या रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांमुळे ही संख्या पुन्हा वाढली. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना 14 दिवस होम क्वॉरंटाईन मध्ये ठेवण्यात येत आहे तर संशयित कोरोना रुग्णांना संस्थात्मक क्वॉरंटाईन खाली ठेवण्यात येत आहे.
या कंटेनमेंट झोनमधील तब्बल 18 झोनचा 14 दिवसांचा कालावधी संपल्याने एकूण झोन ची संख्या महिनाभरात तब्बल 100 ने कमी झाली आहे.
14 दिवसांचा कंटेनमेंट झोनचा कालावधी संपलेल्या गावांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1) चिपळूण तालुका – तिवडे, कामथे, धामणवे, खेर्डी, दोनवली, कुटरे.
2) संगमेश्वर – निवे बुद्रुक, पांगरी
3) दापोली – बांधतिवरे, आंजर्ले, मुगीज
4) लांजा – रुण, वेरवली, प्रभानवल्ली, खावडी
5) गुहागर – वरचा पाट, वरवेली
6) खेड – खोपी