चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा वन्यजीव सप्ताह चित्रकला स्पर्धेत गौरव

दापोली (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने १ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.

दापोली वन परिमंडळ आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत चंद्रनगर शाळेतील आरोही दीपक मिसाळ हिने प्रथम क्रमांक, अथर्व विकास पातेरे याने द्वितीय क्रमांक, तर नीरव सचिन मोरे याने तृतीय क्रमांक पटकावला.

चंद्रनगर शाळेत आयोजित बक्षीस वितरण समारंभात चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, वनपाल रामदास खोत, सामाजिक वनीकरणचे वनरक्षक आत्माराम माने, कोंगळेचे वनरक्षक प्रभू साबणे, खेर्डीचे वनरक्षक विश्वंभर झाडे, बांधतिवरेचे वनरक्षक सुरज जगताप, ताडीलच्या वनरक्षक शुभांगी गुरव, चंद्रनगर ग्रामपंचायत सदस्य गौरी मुलुख, ग्रामविकास अधिकारी संदीप सकपाळ, अनिल शिगवण यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तू आणि गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी रामदास खोत, आत्माराम माने, प्रभू साबणे आणि सरपंच भाग्यश्री जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना ‘वन्यजीव संरक्षण – काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबू घाडीगांवकर यांनी केले, तर रेखा ढमके यांनी सर्वांचे आभार मानले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*