भाजपा दापोलीत सर्वच्या सर्व जागा लढवणार ! – मकरंद म्हादलेकर

दापोली : नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात आघाडी होण्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपा या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत आहे.

दापोली शहरात भाजपा 17 वॉर्डांमध्ये निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे आणि त्या दृष्टीने आमची तयारी झाली आहे, अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी दिली आहे.

भाजपाची या निवडणुकीमध्ये कुणाशीही युती होणार नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. युतीसाठी आतापर्यंत आम्ही कुणालाही संपर्क केलेला नाही किंवा कुणी आम्हालाही संपर्क केलेला नाही. जर शहरामध्ये आमच्या युतीबाबत काही चर्चा असतील, तर त्या निव्वळ अफवा आहेत, असं देखील ते म्हणाले आहेत.

दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आमची तयारी जवळ जवळ पूर्ण झाली आहे आणि येत्या दोन दिवसांमध्ये आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू, असे देखील मकरंद म्‍हादलेकर ‘माय कोकण’शी बोलताना म्हणाले.

दापोलीतील यंदाच्या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत पाहायला मिळेल, हेच या घडामोडींवरून दिसत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*