भाजप महिला मोर्चा, new रत्नागिरीतर्फे प्रभाग क्रमांक १४ मध्ये उत्साहपूर्ण छत्री वाटप कार्यक्रम

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, रत्नागिरीच्या वतीने प्रभाग क्रमांक १४ मध्ये छत्री वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांच्या सौजन्याने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरजू नागरिक आणि महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक नागरिकांनी छत्री वाटपाचा लाभ घेतला.

छत्री वाटप करताना सौ. वर्षा ढेकणे म्हणाल्या, “भारतीय जनता पार्टी केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून वर्षभर समाजसेवा आणि गरजूंसाठी कार्यरत असते. महिलांच्या हितासाठी आणि त्यांच्या गरजांसाठी भाजप महिला मोर्चा नेहमीच अग्रेसर राहील.” या उपक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी भाजपच्या समाजसेवा कार्याची माहिती दिली आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, प्रशांत डिंगणकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, तसेच विक्रम जैन, संदीप सुर्वे, निलेश आखाडे, अमित विलणकर, नितीन जाधव, गुरुप्रसाद फाटक, ज्ञानेश पोतकर, सौ. मनाली राणे, भास्कर सुतार, प्रतीक देसाई, संतोष सावंत, तुषार देसाई, सचिन गांधी, बबलू विलणकर, वैभवी शिवलकर, मुकुंद विलणकर, समीर वस्ता, प्रणाली रायकर, शैलू बेर्डे, प्रवीण रायकर, भक्ती दळी, सायली बेर्डे, मंदार खांडकर, सानिका शर्मा, अमेय घुडे, कमलाकर जोशी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सामाजिक उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि भाजपच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी भाजप नेहमीच कटिबद्ध असल्याचे दिसून आले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*