भाजपा जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी मुख्यमंत्री उदध्व ठाकरे, पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून दापोली DCC सुरू करण्याची मागणी केली आहे.
आपल्या पत्रामध्ये त्यानी लिहिलं आहे की, “२० जुलै २०२० पर्यंतची आकडेवारीनुसार रत्नागिरी जिल्हामध्ये ४२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला होता. त्यामध्ये दापोली तालुक्यातील १० लोकांचा समावेश होता. याच काळात कोव्हीड व्यतीरिक्तही अनेक पेशंट योग्य ते औषधोपचार न झाल्याने दुर्देवाने मृत्युमुखी पडले आहेत. वाढत्या रूग्णांच्या संख्येचा विचार करता दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने डेडिकेटेड कोरोना सेंटर (DCC ) म्हणुन सुरू करणे आवश्यक आहे.”
दापोलीतील रूग्णांना नक्की काय त्रास होतो आहे याची विस्तृत माहिती पत्रामध्ये देण्यात आली आहे. “एखाद्या रूग्णाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे १७० km इतका प्रवास करून पाठवावी लागते. व्हेंटीलेटर युक्त रूग्णवाहिकांची कमतरताही मोठया प्रमाणावर जाणवत आहे. या सगळ्याचा विचार करता व संभाव्य मृत्यु दर कमी करण्याकरिता तातडीने दापोली येथील उपजिल्हा रूग्णालयात DCC सेंटरला मान्यता मिळावी तसेच पाच व्हेंटीलेटरही तातडीने उपलब्ध करून द्यावेत हि विनंती.” अशी मागणी पत्रात केली आहे.