दापोली : जखडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दापोलीतील शाहीरांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी दापोली ग्रामीण आणि मुंबई विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच “मानाचा शाहीर जाखडी नृत्यकला स्पर्धा २०२५” आयोजित करण्यात येत आहे.

ही स्पर्धा येत्या शनिवारी, ३० ऑगस्ट २०२५ रोजी दापोली येथील राधाकृष्ण मंदिरात दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत होणार आहे.

कोकणच्या सांस्कृतिक परंपरांनी नटलेल्या गणपती उत्सवात जाखडी नृत्यकला हा एक महत्त्वाचा लोककला प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून ओळखला जाणारा हा कला प्रकार दापोली तालुक्यात गणेशोत्सवात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहाने सादर केला जातो.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) रविंद्र चव्हाण आणि भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य आमदार सूर्यकांत दळवी यांच्या प्रेरणेने, तसेच जिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी सतीश मोरे यांच्या माध्यमातून  आणि माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

याशिवाय, भाजप प्रदेश कार्यकारिणी (महाराष्ट्र राज्य) सदस्य (निमंत्रित) आणि महाराष्ट्र राज्य काजू मंडळ संचालक डॉ. रुपेश रमाकांत बेलोसे तसेच भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षय फाटक यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला रोख रु. २५,०००/- आणि चषक, द्वितीय क्रमांकाला रोख रु. १५,०००/- आणि चषक, तृतीय क्रमांकाला रोख रु. १०,०००/- आणि चषक प्रदान केले जाणार आहेत. याशिवाय, उत्कृष्ट गायक आणि उत्कृष्ट वादक यांना प्रत्येकी रोख रु. २,२२२/- आणि चषक देऊन सन्मानित केले जाईल. तसेच, दापोली तालुका मानाचा शाहीर या विशेष पुरस्कारानेही गौरवण्यात येणार आहे, ज्यामध्ये रोख रक्कम आणि भेटवस्तूंचा समावेश आहे.

दापोली तालुक्यातील भारदे सुरुर्जी, प्रभाकर चोरने, बनंत मांडवकर यांसारख्या नामवंत शाहीरांनी जाखडी नृत्याला खऱ्या अर्थाने नावारूपास आणले आहे.

हा कला प्रकार केवळ विशिष्ट वर्गापुरता मर्यादित नसून, बाल, वृद्ध, पुरुष, आणि महिला यांच्या सहभागाने सादर केला जातो.

गावातील मंडळांप्रमाणेच मुंबईतील चाकरमानी देखील या कला प्रकाराचा आनंद घेण्यासाठी गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात.

या स्पर्धेच्या आयोजनामुळे दापोलीतील जाखडी नृत्यकलेला नवीन उभारी मिळेल आणि नवोदित शाहीरांना आपली कला सादर करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क: रुपेश रमाकांत बेलोसे – ८८७९३८७९९९ / ८५९१०१०७३१.