दापोली : भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारणीमध्ये
युवा मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अतुल गोंदकर यांची निवड घोषित केली.
गेल्या ३ वर्षांपासून युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदाचा कार्यभार सांभाळण्याल्यानंतर जिल्हाध्यक्ष म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी अतुल गोंदकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
सामाजिक क्षेत्रामध्ये अतुल गोंदकर हे सातत्याने कार्यरत आहेत. भाजपाचा आश्वासक तरुण चेहरा म्हणून अतुल गोंदकर यांच्याकडे पाहिलं जातं. अतुल गोदकर यांनी जेसीआयच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलं आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन, अशी प्रतिक्रिया त्यांनी माय कोकण जवळ बोलताना दिली आहे.
उत्तर रत्नागिरीमध्ये तरुणांची उत्तम फळी निर्माण करण्यासाठीची आखणी अतुल गोंदकर यांनी तातडीने सुरू केली आहे. राष्ट्र प्रथम मग पक्ष आणि त्यानंतर स्वतः या धोरणावर मी आतापर्यंत चालत आलो आहे. यापुढे देखील माझं असंच धोरण राहील हे देखील सांगायला, अतुल गोंदकर विसरले नाहीत.
भाजपाला कोकणातील तळागाळापर्यंत तरुणाईच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम आम्ही सगळे मिळून करणार आहोत. पक्षाला सर्वोत्तम देण्याची माझी तयारी आहे. दापोली, खेड, मंडणगड, गुहागर आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये भाजपाची तरूणांची उत्तम टीम निर्माण करण्यासाठी लवकरच दौरा काढणार असल्याचंही, अतुल गोंदकर यांनी माय कोकणशी बोलताना सांगितलं.