दापोली : भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) दापोली मंडलाने अतुल अनंत गोंदकर यांची रत्नागिरी उत्तर दापोली मंडल दापोली शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. “प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” या राष्ट्रनिष्ठ तत्वाला अनुसरून कार्य करणाऱ्या गोंदकर यांच्या नियुक्तीने दापोलीतील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अतुल गोंदकर यांनी नेहमीच समाजहितासाठी प्रामाणिकपणे कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दापोली शहरात सकारात्मक बदल आणि पक्षाच्या विचारधारेचा प्रसार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या या नियुक्तीच्या निमित्ताने दापोली मंडल अध्यक्षा जया अजय साळवी यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे , जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, जिल्हा चिटणीस संजय सावंत, माजी दिव्यांग सेल जिल्हा संयोजक रविंद्र गायकवाड, कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष स्वरुप महाजन, ग्रामीण तालुकाध्यक्ष सचिन होडबे, तालुका सरचिटणीस विवेक भावे, माजी शहराध्यक्ष संदीप केळकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा अनुजा साळुंखे, तालुका चिटणीस संजय घाडगे, जिल्हा संवादक अमोल चोरगे, सोशल मीडिया तालुका संयोजक धिरज पटेल, मयुरेश वेल्हाळ, राजेश पवार, नवनाथ जाधव तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जया साळवी यांनी अतुल गोंदकर यांना नियुक्ती पत्र देताना सांगितले की,

“अतुल गोंदकर यांनी आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे. त्यांचे राष्ट्र आणि समाजाप्रती असलेले समर्पण कौतुकास्पद आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दापोली शहरात भाजपाची विचारधारा अधिक दृढ होईल, याची खात्री आहे”

अतुल गोंदकर यांचे विचार
“राष्ट्रसेवा हा माझा जीवनाचा मूलमंत्र आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दापोली शहरातील प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी मी कटिबद्ध आहे. पक्षाने माझ्यावर सोपवलेली ही जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडेन,” असे अतुल गोंदकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.

गोंदकर यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांद्वारे दापोली परिसरात आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्याला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये आहे. स्थानिक नागरिकांनीही या नियुक्तीचे स्वागत केले असून, गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.