अरुण ढंग यांना संगणकशास्त्र विषयात पीएचडी प्रदान

घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे अरुण ढंग यांना श्री. जे. जे. टी. विद्यापीठाकडून संगणकशास्त्र विषयातील विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.

ढंग यांनी प्रज्ञा वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली “प्रभावी शिक्षणासाठी उच्च शिक्षणात शिक्षण व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी: विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाचा अभ्यास” या विषयावर संशोधन करून आपला प्रबंध सादर केला होता.

या संशोधन कार्यासाठी त्यांना हनुमंत रेणुसे, अभिजित देसाई, डी. जगताप, सचिन भोसले, विनायक पुजारी, अमित जाधव आणि रिंकेश छेडा यांचे सहकार्य लाभले.

अरुण ढंग यांनी संगणकशास्त्र व भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीसह कायद्याची पदवी संपादन केली असून, त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध सादर केले आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात १७ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ढंग यांनी यापूर्वी महाराष्ट्र तंत्रनिकेतनमध्ये प्राचार्य पद भूषवले असून त्यांना स्टार एज्युकेशन अवॉर्डनेही गौरवण्यात आले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य पी. बी. पाटील, संस्थेचे व्यवस्थापन, शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*