दापोली तालुक्यातील साखळोली येथे भीषण अपघात एकाचा मृत्यू तर एक गंभीर

दापोली: दि. १७ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दापोली तालुक्यातील साखळोली शिवाजीनगर येथे झालेल्या भीषण अपघातात नितेश जाधव वय २९ याचा मृत्यू झाला आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर नं. एम.एच. ०४ एफजे ३२६७ हा करजी (खेड) ते दापोली- गावतळे- शिवाजीनगर या अंतर्गत रोडने जात असताना याचदरम्यान नितेश जाधव व जितेंद्र चव्हाण हे आपल्या ताब्यातील अक्टीव्हा गाडी नं, एमएच ०८ यु २०९१ हे दोघे याच मार्गावरुन प्रवास करीत असताना मोटारसायकला डंपरने पाठीमागुन ठोकर दिल्याने मोटार सायकल स्वार गाडीसहीत रस्त्यावर पडल्याने त्यांचेवरुन डंपर जाऊन त्यामध्ये नितेश नामदेव जाधव व जितेंद्र काशीनाथ चव्हाण हे दोघेही गंभीर झाले. या दोघांनाही दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. परंतु नितेश जाधव याला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर जितेंद्र चव्हाण हे गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुणाल मेहता यांनी उपचार केले व अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे पाठविण्यात आले. परंतु नातेवाईकांनी पुढील उपचाराकरिता लाइफ केअर हॉस्पिटल चिपळूण येथे दाखल केले आहे. या घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक पुजा हिरेमठ करित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*