अभिजित हेगशेट्ये यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश

रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरीतील अभिजित हेगशेट्ये यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हेगशेट्ये यांच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रत्नागिरी बळ मिळणार आहे.

जेष्ठ पत्रकार, शैक्षणिक आणि सामाजिक संस्थात्मक कार्यात अभूतपुर्व योगदान असणारे अभिजित हेगशेटये यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेसमध्ये खासदार आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुनिल तटकरे यांच्या हस्ते सन्मानित होत पक्ष प्रवेश केला.

यावेळी पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य बशीर मुर्तुझा उपस्थित होते.

अभिजित हेगशेटये यांच्या सारख्या सामंजस्य व्यक्तीनं राष्ट्रवादी पक्षात सक्रिय प्रवेश करावा ही आनंदाची, वैचारिक आणि सृजनशील राजकीय वाटचालीचं द्योतक आहे. त्यांचं रत्नागिरी राष्ट्रवादी कॉंग्रेस मनापासून स्वागत करत आहे.

अशी प्रतिक्रीया बशिर मुर्तुझा यांनी व्यक्त केली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*