दापोली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ईगल स्केटर्स क्लब,दापोलीचे खेळाडू कु. प्रद्युम्न प्रथमेश दाभोळे आणि कुमारी सई महेश महाडिक यांनी आपल्या महान भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत पारंपारिक वेशभूषेत 1 तास स्केटिंग करत वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया, ग्लोबल जीनियस रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचा अटेम्प्ट यशस्वी रित्या पूर्ण केला.

या दोघांचा उत्साह वाढवण्यासाठी कु. साहिल गडदे याने या खेळाडूंसोबत रेकॉर्ड पूर्ण होईपर्यंत स्केटिंग केले.
स्वातंत्र्याच्याअमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील विविध जिल्हातून २२०० स्केटिंग खेळाडूनी एकाचवेळी सर्वत्र आपआपल्या शहरात संध्याकाळी ५.००ते ६.००वाजेपर्यत १तास न थांबता राष्ट्रध्वज हातात घेवून स्केटिंग करत रेकॉर्ड अटेम्प्ट पुर्ण केला.

रेकॉर्ड अटेम्प्ट पुर्ण केल्याबद्दल प्रद्युम्न दाभोळे आणि सई महाडीक यांना दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा. श्री. विवेक अहीरे यांच्या हस्ते मेडल देऊन गौरवण्यात आले.
या दोन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री प्रथमेश दाभोळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा रेकॉर्ड अटेम्प्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सौ. प्रिती दाभोळे व श्री.शैलेश मिसाळ यांनी काम पाहिले.

या सर्व यशस्वी खेळाडूंनाभटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष्या सौ. संपदा पालकर, डॉ. सौ. विद्या दिवाण, महेश्वर जाधव, पोलीस अंमलदार विकास पवार, प्रदिप रजपुत, अनिरुद्ध कदम, योगेश कदम, महेश व सौ.अपूर्वा महाडीक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंवर दापोलीतून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.