दापोली: दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूल म.ल.करमरकर भागशाळा उंबर्लेच्या विद्यार्थिनींनी दि. १० व ११ मे २०२५ रोजी चैतन्य सभागृह, सोहनी हायस्कूल, दापोली येथे आयोजित राष्ट्रीय लाठी व दांडपट्टा स्पर्धेत देदीप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत पाच राज्यांमधील मुला-मुलींनी सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेत श्रेया येसवारे हिने १८ वर्षावरील मुलींच्या गटात दुहेरी लाठी चक्री प्रकारात सुवर्णपदक, तसेच १४ वर्षाखालील मुलींच्या गटात रौप्यपदक पटकावले. याशिवाय, श्रुती झाटे, आदिती काष्टे, श्रावणी काष्टे आणि प्रियल झाटे यांनी लाठी संघ द्वंद्व आणि संघहात दांडपट्टा या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्र संघाला जेतेपद मिळवून दिले.

या यशस्वी विद्यार्थिनींना लाठी-काठी प्रशिक्षक सुरेंद्र शिंदे आणि कविता शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनी आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे दापोली शिक्षण संस्थेचे नियामक मंडळाचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, सचिव डॉ. विनोद जोशी, शालेय समितीचे चेअरमन रवींद्र कालेकर, संस्थेचे सर्व संचालक, मुख्याध्यापक एस.एम. कांबळे, उपमुख्याध्यापक डी.एम. खटावकर, भागशाळा उंबर्ले प्रमुख डी.आर.जाधव, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग यांनी विशेष कौतुक केले आहे.