दापोली- रत्नागिरी जिल्हा परिषद आयोजित ‘नासा- इस्रोस विद्यार्थी भेट’ उपक्रमांतर्गत दापोली तालुकास्तरीय चाळणी परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केल्याने जिल्हा परिषद शाळा चंद्रनगरची विद्यार्थीनी आरोही महेश मुलूख हिची जिल्हास्तरावरील परीक्षेसाठी निवड झाल्याबद्दल तिचे कौतुक होत आहे.

याआधी केंद्रस्तरीय परीक्षेत प्राविण्य मिळविल्याने आरोही मुलूख हिची दापोली तालुकास्तरीय परीक्षेसाठी निवड झाली होती. या परीक्षेतही तिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

आरोही मुलूख हीस शाळेतील मानसी सावंत, अर्चना सावंत, मनोज वेदक, बाबू घाडीगांवकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.

गेल्या वर्षी याच उपक्रमांतर्गत आरोही मुलूख हिचा मोठा भाऊ आयुर मुलूख याची इस्रो भेटीसाठी निवड झाली होती.

आरोहीने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, मुख्याध्यापिका अर्चना सावंत, गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख सुनिल कारखेले, दापोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, दापोली तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.