दापोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दापोली तालुका अध्यक्षपदी सचिन तोडणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन तोडणकर हे राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या स्थापनेपासून कार्यकर्ते असून त्यांची पक्षामध्ये शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्त म्हणून ओळख आहे.
माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख, जिल्हा निरिक्षक बबनराव कनावजे, जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश शिगवण, दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष अमित कदम, जि. प. सदस्या सुजाता तांबे, जेष्ठ कार्यकर्ते रविंद्र कालेकर, दत्ताराम जगदाळे, एम. आर. शेट्ये, काका पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी सईद कोंडेकर, अॅड. खलील डिमडिमकर, शराफत नांदविडकर, कुमुद्दीन बेर्डे, सईद कुळेकर आदी उपस्थित होते.
सचिन तोडणकर हे उच्चशिक्षित (M.Sc. Agri.) असून सन २०१० पासून कर्दे ग्रामपंचायत सदस्य, सन २०१५ पासून कर्दे ग्रामपंचायत सरपंच म्हणून कार्य करीत आहेत. तसेच भंडारी हितवर्धक ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत. तसेच दापोली तालुक्यातील पर्यटन वाढीसाठी ते कार्य करीत आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठन, मुंबई रत्नागिरी शाखेचे सदस्य ते आहेत. त्याच्या विविध कार्याची दखल घेवून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीने पक्षाने त्यांची तालुका अध्यक्ष निवड केली आहे.