दापोली :  दापोली तालुक्यातील उसगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर  यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या निमित्तानं पक्ष प्रवेश आणि पद नियुक्तीपत्र देण्यात आले. दापोली उप तालुकाध्यक्षपदी – रविंद्र धोपावकर,
पं. स. उसगाव विभागध्यक्षपदी – अरविंद महाडीक, उपविभाग अध्यक्ष – मंदार दांडेकर, उपविभाग अध्यक्ष – शांताराम भांबिड,  उसगाव शाखा अध्यक्षपदी अनंत कांगणे यांची नियुक्ती करण्यात आली.

या वेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन गायकवाड, दापोली तालुकाध्यक्ष नितीन साठे, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष अरविंद पुसाळकर, जालगाव विभागध्यक्ष स्वप्निल पाते, शुभम शिंदे, नाझिम साकरकर, प्रसिद्धी माध्यम प्रमूख खेड शहर अंकुश मिर्लेकर, जयेश गुहागरकर,अभि कर्वे, विजय चव्हाण, मुंबई मनसे कार्यकर्ते वसंत येद्रे, हरिश कोळबेकर, लक्ष्मण हरेकर, मंगेश टेमकर उपस्थित होते .