रत्नागिरी: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून ्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.सोमवार 14 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता शिर्के हेलिपॅड मुंढवा, पुणे येथून हेलिकॉप्टरने भंडारपुळे हेलिपॅड,ता.जि.रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी 02.00 वाजता. हेलिकॉप्टरने भंडारपुळे हेलिपॅड ता.जि.रत्नागिरी येथे आगमन व मोटारीने मालगुंड ता.जि.रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी 02.10 वाजता चंडीका मंदिर जिर्णोध्दार कार्यक्रमास उपस्थिती.(स्थळ : मालगुंड, ता.जि.रत्नागिरी) दुपारी 02.30 वाजता मालगुंड, ता.जि.रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी 03.15 वाजता मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजनेबाबत आढावा बैठक.(स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी सोईनुसार रत्नागिरी येथून मुंबई कडे प्रयाण.