पुणे -छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि.19 फेब्रुवारी रोजी आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी सात दिवस शिल्लक आहे. यावर्षी शिवजंयती साजरी करण्यासाठी करोना नियमांमध्ये शिथिलता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हेलिकॉप्टरमधून प्रवास करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे किल्ले शिवनेरी येथील कार्यक्रमात ते उपस्थित राहणार नाहीत. नियमावली जाहीर झाल्यानंतर ती विविध खात्यांना दिली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जन्मसोहळ्यातील कार्यक्रमात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आपण शिवेनरीवर उपस्थित राहणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.