दापोली बाजारपेठेतील जमातुल मुस्लिमीन जामा मशिदीच्या अध्यक्षपदी हमीद बांगी यांची निवड करण्यात आली आहे. दापोली बाजारपेठेचे ते रहिवासी आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. हमीद बांगी लोकांच्या अडीअडचणीच्या काळात कायम उपलब्ध असतात. बाजारपेठ जमातचे ते अध्यक्ष झाल्यामुळे त्यांचं अभिनंदन होत आहे.

पुढील तीन वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे