मुंबई : महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. 14 डिसेंबरपासून त्यांच्या दौऱ्याला सुरूवात होणार आहे.

महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक झाली.

या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली. मनसे निवडणुकांसाठी सज्ज झाली असून, त्याची सुरुवात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यापासू आहे.

महाराष्ट्रात आगामी काळात महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

या निवडणुकां पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागले आहेत. पक्षांकडून जिल्हानिहाय आढावा बैठका सुरू आहेत.

या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच मनसेही प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहे. तशी तयारी आतापासूनच मनसेकडून सुरू आहे. मुंबईत राज ठाकरे यांच्या नवीन घरातच पक्षाचे नेते आणि सरचिटणीस यांची विशेष बैठक पार पडली.

यामध्ये आगामी निवडणुकांच्या संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. राज ठाकरे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून  महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.