चिपळूण : सामाजिक सोमवारी मुंबई-गोवा महामार्गावरून पोलीस बंदोबस्तात पोफळी बस धावली. या गाडीला प्रवाशांचा प्रतिसादही उत्तम मिळाला.

दापोली येथे एसटी बसवर दगडफेक झाली होती. त्या पार्श्वभूमीवर चिपळूण आगारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चिपळूण पोफळी एस.टी. बस पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आली.

एस.टी.चं शासनामध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी एस.टी. कामगार ठाम आहेत. शासनाने पगार वाढ देऊन देखील कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही.

काही ठिकाणी झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण मध्यवर्ती एस.टी. स्थानक येथे पोलीस सतर्क आहेत. सकाळी साडेदहा वाजता सुटणारी चिपळूण पोफळी ही बस पोलीस सुरक्षेसह सोडली गेली.

एस.टी.च्या गाडीपुढे पोलीसांची गाडी स्थानकाच्या बाहेर पडली. महामार्गावरून पोलीस गाडीच्या मागोमाग एस.टी. बस धावत असल्याचं चित्र पाहायला मिळालं.