दापोली : तालुक्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ क्रिकेटपटू शेखर आग्रे यांनी माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
गेल्या दापोली नगर पंचयतीच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीनं शिवसेनेकडून उदयनगर परिसरातून निवडणूक लढवली होती. आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं शिवसेनेला धक्का बसला आहे.
यावेळी माजी आमदार संजय कदम, तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, उपजिल्हा प्रमुख खालीद रखांगे, विधानसभा क्षेत्राध्यक्ष मुजीब रूमाणे, जि.प. सदस्य मोहन मुळ्ये, शहराध्यक्ष नितीन मयेकर, पं. स. दिपक खळे, विलास शिगवण, रविंद्र कालेकर, धीरज पटेल, विराज जोशी उपस्थित होते