रत्नागिरी:- तालुक्यातील झरेवाडी येथील बहुचर्चित श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटीलबुवा व त्याचा साथिदार जयंत रावराणे यांची विनयभंगाच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी या खटल्याचा निकाल दिला.
मात्र जादुटोणा विरोधी कायद्यातून पाटीलबुवा याच्यावर दाखल गुन्ह्याचा खटला अद्याप न्यायालयात सुरू आहे.
गुरुवारी अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने पाटीलबुवा व त्याचा साथिदार रावराणे यांची निर्दोष मुक्तता केली.
पाटीलबुवाच्या वतीने अॅड निनाद शिंदे, ॲड. राहूल चाचे व तन्वी गद्रे यांनी काम पाहिले.