रत्नागिरी – संपात सहभागी न होता सेवेत राहणाऱ्या चालक आणि वाहकाना थांबवून त्यांच्या गळ्यात हार घातल्याचे कारण दाखवून रत्नागिरीतील 18 आणि राजापूर मधील 9 एस.टी. कामगारांचे पुढील आदेश येईपर्यंत एसटी प्रशासनाने निलंबन केलं आहे.
राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यातही एस. टी. कामगारांचा संप सुरू असून त्यात 90 टक्के पेक्षा जास्त कामगार, कर्मचारी सहभागी झाले आहेत. जे चालक वाहक संपात सहभागी नाही या दोघांनी काही दिवसांपूर्वी राजापूर येथून रत्नागिरीत बस आणली होती. त्यांना वाटेत थांबवून काही कामगारांनी त्यांच्या गळ्यात हार घालून गांधीगिरी केली होती.
त्या प्रकरणी एस. टी. प्रशासनाने संपात सहभागी 27 एस. टी. कर्मचाऱ्यांचे या प्रकरणी चौकशी होऊन पुढील आदेश येईपर्यंत निलंबन करून त्यांच्या वेतनात आणि महागाई भत्त्यात सुद्धा या कालावधीत 50 टक्के कमी केला आहे.