दापोली : गत वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी प्रथम एज्युकेशन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. प्रथम संस्थेच्यावतीने प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर यांच्या मार्फत शाळेबाहेरची शाळा रत्नागिरी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदूराणी जाखड यांच्या प्रेरणेने शिक्षणाधिकारी निशा देवी वाघमोडे संदेश कडव, मुरकुटे इयत्ता पहिली ते तिसरी साठी राबवत असलेला महत्त्वाकांक्षी उपक्रम पहिलं पाऊल.
रत्नागिरी डाइटतर्फे डॉक्टर गजानन पाटील प्राचार्य डायट, निवासी प्राचार्य सुशील कुमार शिवलकर, दापोली संपर्कप्रमुख संदीप पवार उर्दू विभाग प्रमुख शमुनाफ गुहागरकर यांचेमार्फत कोरोना काळात सुरू असलेले शैक्षणिक उपक्रम तसेच केंद्रप्रमुख ताजुद्दीन परकार आपल्या हर्णे केंद्रात राबवत असलेले महत्वकांक्षी उपक्रम कोरोना के साथ भी और तुफान के बाद भी, कुछ हम कहे कुछ आप कहो, शाळा आपल्या दारी, मी केंद्रप्रमुख बोलतोय, माय गॅलक्सी इत्यादी उपक्रमांची दखल घेऊन कोकण विभागीय समन्वयक श्रीमती ऋतुजा पाटील यांनी आकाशवाणी नागपूरच्या निदर्शनास आणून दिल्याने नागपूर आकाशवाणी केंद्रामार्फत निवेदिका आरजे रेश्मा यांनी हर्णे केंद्राचे केंद्रप्रमुख ताजुद्दीन परकार व जीवन शिक्षण विद्यामंदिर हर्णे नं. १ची इयत्ता ५वीतील विद्यार्थिनी कुमारी सानवी सचिन मळेकर इयत्ता पाचवी वर्गशिक्षिका दर्शना कदम, शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ शेखर विळणकर व पालक सचिन मळेकर यांच्याशी विविध उपक्रमांत संदर्भात गप्पा मारून मुलाखत घेण्यात आली.
ही मुलाखत १९ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी 10:30 वाजता आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित प्रसारित केली जाणार आहे.
रेडिओ नागपूरवरून प्रसारित होणाऱ्या 184 व्या भागासाठी सानवी मळेकर इयत्ता पाचवी तिला दिशा या घटकावर आधारित प्रश्न विचारले गेले. तर केंद्रप्रमुख ताजुद्दीन प्रकार यांना कोरोना काळातील शाळा बंद शिक्षण सुरु याअंतर्गत विविध उपक्रमांबाबत माहिती विचारली गेली. या प्रसंगी मुख्याध्यापक रुके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर राणे पालक, रमेश सचिन मळेकर व शिक्षक वृंद उपस्थित होते.
सदर प्रसंगी केंद्रात सुरू असलेले पहिले पाऊल व्हिजन, दापोली शाळेबाहेरची शाळा अंतर्गत शाळा आपल्या दारी, ऑनलाईन शिक्षण गृहभेटी, व्हिजन दापोली सेमी इंग्लिश स्पोकन इंग्लिश, माय गॅलक्सी कोरोना के साथ भी और तुफान के बाद भी, कुछ हम कहे कुछ आप कहो, किलबिल, मी केंद्रप्रमुख बोलतोय या उपक्रमांची माहिती केंद्रप्रमुख परकार यांनी दिली.
तसेच सातत्याने विविध नवनवीन उपक्रम राबवत असल्याने शाळांच्या गुणवत्तेमध्ये जो अमुलाग्र बदल झालेला आहे, त्याबाबत देखील माहिती दिली. 2013 पासून केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करून सातत्याने पर्यवेक्षण व परीक्षण केल्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण शिक्षण दिले जाते. याबाबत पालकांमध्ये विश्वास संपादित केला, तसेच हर्णे उर्दू केंद्रीय शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेची ज्युनियर व सिनियर केजी सुरू केल्याने जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दुपटीने वाढ झाली.
पालकांचा जिल्हा परिषद शाळांवर विश्वास संपादित झाला असल्याने यावर्षी जीवन शिक्षण हर्णे मंदिर विद्या मंदिरहर्णे मध्ये इयत्ता पहिली मध्ये 100 बालके दाखल झाल्या आहेत तर हर्णे उर्दू केंद्रे शाळेत 48 व पाजपंढरी मराठी शाळेत 78 बालके दाखल झाली आहेत. इंग्रजी माध्यमातून जवळपास 30 विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झाले आहेत व पटसंख्या झपाटाने वाढ झाली आहे.
यावर्षी हर्णे मराठी नंबर 1 ची पटसंख्या 531 उर्दू ची पटसंख्या पाजपंढरी मराठी शाळेची पटसंख्या 421 झाली आहे.
कुमारी सानवी मळेकर हिला वर्गशिक्षिका दर्शना राजेश कदम व गणपत जानकर, मुख्याध्यापक रुके, जयंत सुर्वे व शिक्षक वृंद तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले. तर शाळा बाहेरची शाळा उपक्रमाच्या कोकण विभागीय समन्वयक ऋतुजा पाटील यांनी हर्णे केंद्राच्या उपक्रमांची दखल घेऊन नागपूर आकाशवाणीसाठी निवड केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बद्रुद्दिन गावकर, सुधीर राणे केंद्रप्रमुख ताजुद्दीन परकार यांनी आभार व्यक्त केले आहेत.
नुकतीच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माननीय विक्रांत जाधव, आमदार योगेश कदम, शिक्षण सभापती मणचेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, शिक्षणाधिकारी निशा देवी वाघमोडे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव मुरकुटे, गट विकास अधिकारी आर एम दिघे, गटशिक्षणाधिकारी बळवंतराव, शिक्षण विस्ताराधिकारी लहांगे यांनी नुकतीच हर्णे येथे भेट देऊन शैक्षणिक गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केल्याचेही विळणकर यांनी यावेळी नमूद केले.
कुमारी सानवी, परकार व केंद्रातील सर्व शिक्षकांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
2