दापोली येथिल रसिक रंजनचे मालक विलास म्हमणकर यांच्या आंजर्ले येथील घरात चोरी झाली आहे. ते चार दिवस घर बंद करून दापोली येथे रहायला आले होते.
ही संधी साधून अज्ञात चोरट्यानं मागील दरवाजा ढकलून तोडुन आतील खोलीचा दरवाजा ढकलून तोडुन माजघरात प्रवेश करून लाकडी कपाटाचे पोटलॉक तोडून लोखंडी तिजोरीच्या व लॉकरच्या चाव्या स्टिलच्या डब्यातून काढून घेवून तिजोरी उघडुन लॉकरमधिल ४,५४,००० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २७,०००/- रु. रोख रक्कम चोरले आहेत.
दापोली पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
https://mykokan.in