चिपळूण : परदेशात नोकरी अथवा शिक्षणासाठी जाणाऱ्या नागरीकांना कोव्हिशिल्ड पहिला डोस नंतर ‘डोसकरीता असलेली ८४ दिवसांची अट शिथिल करण्याची मागणी आमदार शेखर निकम यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील बहुसंख्य नागरीक कामानिमित्त अथवा नोकरीनिमित्त परदेशात असून काहीजण गावी आलेले आहेत. अशा काही नागरीकांनी कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतला आहे. पहिल्या डोसच्या सर्टिफिकेटनुसार दुसरा डोस २८ दिवसांच्या कालावधीवरती असल्याने कंपनीने नोकरीमध्ये काहींना सवलत दिली होती. परंतु आता दुसरा डोस ८४ दिवसांवर गेल्यामुळे साधारणतः तीन महिन्यांचा लागणार आहे. त्यामुळे परदेशात नोकरीस जाणाया नागरीकांमध्ये नोकरी जाण्याची भिती निर्माण झाली आहे.
तरी कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोस मधील असलेला ८४ दिवसांचा कालावधी कमी करुन ३० ते ४० दिवसांचा होणेसंदर्भात तातडीने तरतुद सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा असेदेखील शेखर निकम यांनी मागणी केली आहे.