रत्नागिरी – मुस्लिम समाजामध्ये रमज़ान महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. 30 दिवसांचे कडक उपवास करून रमज़ान ईद साजरी केली जाती. कोकणत यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणानं ईद साजरी करण्यात आली.

रमज़ान महिन्यात कुराण अवतरलं होतं. त्यामुळे हा महिना अत्यंत्र पवित्र मानला जातो. जगभरात या महिन्यात रोजे पाळले जातात. अल्लाहची उपासना केली जाते. पुण्य कमवण्याचा महिना असंही म्हटलं जातं. 16 तासापासून ते 22 तासांपर्यंत रोजे जगभरात हा केले जातात. गरीबांच्या भूकेची जाणीव व्हावी यासाठी रोजे पाळले जातात. जक़ात सुद्धा देणं सक्तीचं आहे. आपल्याकडील सोन्याच्या किंमतीच्या अडीच टक्के रक्कम गरीबांमध्ये वाटप करणं बंधनकारक आहे. हा एक प्रकारे त्यागाचा प्रतिक आहे.

ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. रमजान महिन्यांतील रोजे म्हणजेच उपवास संपल्यानंतर ईद येते. रमजान महिन्याची सांगता ईदने होते. रमजान महिना मुस्लिम धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र सण म्हणून साजरा केला जातो. रमजान महिना संपल्यानंतर चंद्रदर्शन होताच ईद सण साजरा होतो. शुक्रवारी ईद हा सण मुस्लिम धर्मियांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला.

जिल्ह्यासह सान्या देशात कोरोनाचा मोठा कहर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला होता. जिल्ह्यात शुक्रवारी गर्दी न करता ईद साजरी झाली. कोरोना हद्दपार होण्यासाठी अनेकांनी यावेळी दुआ केली.

बुधवारी मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज अदा केल्यानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. रत्नागिरीसह चिपळूण, राजापूर, लांजा, संगमेश्वर, खेड, दापोली, गुहागर आदी तालुक्यांमध्ये ईद शांततेत साजरी करण्यात आली.