मुंबई : कोरोना काही केल्या थांबत नाहीये म्हणून शेवटचा पर्याय म्हणून महाराष्ट्र सरकारने कडक लॉकडाऊन करायचं निश्चित केलं आहे.
ब्रेक दि चेन अंतर्गत उद्या रात्री (22 एप्रिल 2021) पासून नवी नियमावली लागू केली जाणार आहे. उद्या रात्री 8 वाजल्या पासून १ मे पर्यंत हे नियम नवे नियम लागू असणार आहेत.
राज्य सरकारने नव्या नियमातंर्गत राज्यात होणाऱ्या लग्न समारंभांवर वेळेचे बंधन घातले आहे. यापूर्वी लग्न समारंभासाठी २५ लोकांची मर्यादा घातली होती. आता लग्न समारंभ २ तासात आवरण्याचा नियम नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. याचबरोबर या नियमाचे जे कोणी पालन करणार नाहीत त्यांना ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.
याचबरोबर ज्या ठिकाणी लग्न होत आहे आणि नव्या नियमांचे पालन झालेले नाही अशा ठिकाणे कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्ण कमी होत नाही तोपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येतील.
असे आहेत नवे नियम
◼️ एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नागरिकांना प्रवेश बंदी. मात्र सबळ कारण असेल तर प्रवेश दिला जाणार अत्यावश्यक सेवेतील लोकांना मात्र मुभा
◼️ उद्या रात्री 8 वाजल्यापासून 1 मे च्या सकाळी 7 पर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन
◼️ मुंबई लोकलचा प्रवास केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच करता येणार सामान्यांसाठी लोकल प्रवासास निर्बंध घालण्यात आलेली आहे.
◼️ सर्व सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची १५ टक्क्यांपर्यंत उपस्थिती राहणार आहे.
◼️ लग्न समारंभ २५ लोकांच्या उपस्थितीत आटोपणे गरजेचे आहे. तसेच हा समारंभ फक्त २ तासात संपवावा लागणार आहे.
◼️ हा नियम मोडणाऱ्यास ५० हजारांचा दंड करण्यात येणार आहे.
◼️ खासगी वाहतुक फक्त अत्यावश्यक सेवांसाठी सुरु राहणार
◼️ आतंर जिल्हा प्रवास फक्त अत्यावश्यक सेवांसाठी करता येणार
◼️ सार्वजनिक बसेस ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार. पण आंतर जिल्हा अथवा आंतर शहर वाहतुक करता येणार नाही.
◼️ खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक लोकांसाठीच