दापोली : तालुक्यातील केळशी येथील चायनीज दुकान चालवणारा नदीवर पोहायला गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. टिकामल तुलबहाद्दूर कामी (२५) असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी दि १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास घडली. या घटनेचा अधिक तपास हे.कॉ. डी. पी. गोरे करीत आहेत.