रत्नागिरी : रत्नागिरीतील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम उर्फ भाई बेर्डे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. सामाजिक प्रश्नांना थेट हात घालणारे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती.
भाई बेर्डे हे समाजवादी नेते मधू दंडवते यांचे जवळचे सहकारी होते. आणीबाणीच्या काळात त्यांना अटक देखील करण्यात आली होती.
शहरातील बेर्डे स्टोअरचे ते मालक होते. त्यामुळे काही वर्षे ते व्यापारी संघटनेचे अध्यक्ष देखील होते. देवरुख येथील मातृमंदिरचेही ते काही काळ अध्यक्ष होते.
वृत्तपत्र क्षेत्रातही त्यांनी साप्ताहिकाचे संपादक व मालक म्हणून काम केले होतं. साप्ताहिक समानता हे वृत्तपत्र त्यांनी अनेक वर्षे चालविले. त्यामधून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली होती. तसेच त्यांनी अनेक सामाजिक लढ्यांमध्ये नेतृत्व केले हाेते. समाजवादी विचारसरणीचे व्यक्तिमत्व आज हरपलं आहे.