दापोली – शुक्रवार दिनांक ६ मार्च रोजी ऑलिंम्पियाड परीक्षेचा निकाल लागला असून या परीक्षेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत या शाळेचा श्रीयान सुजय मेहता या विद्यार्थ्यांने उल्लेखनिय यश मिळवले आहे.

श्रीयानने महाराष्ट्र राज्यात व देशाच्या पश्चिम विभागात ऑलिंम्पियाड मध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावुन सुवर्ण पदक संपादन केले आहे. तसेच आराध्या दांडेकर हिने शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक तर आराध्य मेहता याने शाळेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदक तर आयुश मळेकर याने शाळेमध्ये तृतीय क्रमांक मिळवून कास्य पदक संपादन केले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनचे संस्था संचालक सूजय मेहता तसेच स्कूलच्या मुख्याध्यापिका रितु मेहता तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.