दापोली: हरिनामाचा गजर आणि भक्तीचा जागर करण्याच्या उद्देशाने दापोली येथे महिला व पुरुष मंडळांसाठी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ, भारतीय जनता पार्टी दापोली आणि फाटक डेव्हलपर्सच्या यांच्या संयुक्तविद्यमाने ही स्पर्धा पार पडणार आहे.
रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता दापोली येथील राधाकृष्ण मंदिरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या भजन स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा विधानपरिषद आमदार प्रमोद जठार, भाजपा विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय, अखिल भारतीय भजन मंडळ राज्य कार्यकारिणी अध्यक्ष भगवान लोकरे आणि अखिल भारतीय भजन मंडळ राज्य कार्यकारिणी उपाध्यक्ष श्रीधर मुणगेकर उपस्थित राहणार आहेत.
तसेच स्पर्धेसाठी विशेष निमंत्रित म्हणून दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, गुहागरचे माजी आमदार विनय नातू, जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष स्मिता जावकर आणि पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून जालगाव ग्रामपंचायतचे सरपंच तथा भाजपा उत्तर रत्नागिरीचे जिल्हा महामंत्री अक्षय फाटक, भाजपा तालुकाध्यक्ष जया साळवी, सचिन होडबे आणि अखिल भारतीय भजन मंडळ दापोली तालुका शाखा अध्यक्ष रमेश कडू काम पाहत आहेत. परिसरातील भजनप्रेमी आणि नागरिकांनी या भक्तिमय सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply