शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

रत्नागिरी पोलिसांच्या ‘एआय’ तंत्रज्ञानाने परभणीतील खून प्रकरणाचा छडा; कवटीवरून चेहरा पुनर्रचित करून पटवली ओळख

रत्नागिरी पोलिसांच्या ‘एआय’ तंत्रज्ञानाने परभणीतील खून प्रकरणाचा छडा; कवटीवरून चेहरा पुनर्रचित करून पटवली ओळख

रत्नागिरी : पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘एआय’ आधारित ‘रेड्स’ (RAIDS) अ‍ॅपच्या मदतीने परभणी जिल्ह्यातील एका गंभीर खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

अनोळखी मृतदेहाच्या कवटीच्या रचनेवरून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने चेहरा पुनर्रचित करून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात आली.

परभणी जिल्ह्यातील दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात ९ मे २०२६ रोजी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता.

या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत व्यक्तीची ओळख पटविणे परभणी पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते.

या तपासादरम्यान पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘एआय’ आधारित ‘रेड्स’ अ‍ॅपची मदत घेण्यात आली.

या अ‍ॅपच्या माध्यमातून अनोळखी मृतदेहाच्या कवटीच्या रचनेनुसार चेहऱ्याची प्रतिमा (फेस रिकन्स्ट्रक्शन) तयार करण्यात आली. हे पुनर्रचित छायाचित्र विविध ठिकाणी प्रसारित करून पोलीस पाटलांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्याबाबत परभणी जिल्हा पोलीस दलाला मार्गदर्शन करण्यात आले.

या तांत्रिक प्रक्रियेमुळे अखेर अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले. मृत व्यक्तीचे नाव गिताराम प्रकाश मुजमुले (रा. देवनांद्रा, ता. पाथरी, जि. परभणी) असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर पुढील तपास करत परभणी पोलिसांनी या खून प्रकरणी मृताचे वडील प्रकाश सखाराम मुजमुले आणि भाऊ कृष्णा प्रकाश मुजमुले या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, रत्नागिरी पोलिसांच्या ‘रेड्स’ अ‍ॅपमुळे गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.

AI Facial Reconstruction, crime news, Daithana Police Station, maharashtra police, Nitin Bagate, Parbhani Murder Case, RAIDS App, ratnagiri police, Technology in Policing

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *