शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

पंचनदी आणि वेळवी कलानगर येथील आदिवासी वस्त्यांमध्ये दिवाळी फराळ व साहित्य वाटप

पंचनदी आणि वेळवी कलानगर येथील आदिवासी वस्त्यांमध्ये दिवाळी फराळ व साहित्य वाटप

दापोली : दिवाळीचा आनंद समाजातील गरजू आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने दापोली तालुक्यातील पंचनदी आणि वेळवी कलानगर येथील आदिवासी वस्त्यांमध्ये फराळ तसेच जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनंदन उर्फ भाऊ भावे यांनी वनौषीतर्फे या उपक्रमाचे आयोजन केले होते.

सणासुदीच्या काळात वंचित घटकांसोबत आनंद साजरा करण्याच्या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत आदिवासी बांधवांना दिवाळीचा फराळ आणि विविध जीवनावश्यक वस्तू सुपूर्द करण्यात आल्या.

या मदतीमुळे आदिवासी वस्तीतील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शांताराम जाधव हे देखील उपस्थित होते.

त्यांच्या उपस्थितीत वस्तीतील कुटुंबांना फराळ व साहित्याचे वाटप पार पडले. सामाजिक बांधिलकी जपत गरजूंसोबत सण साजरा करण्याच्या या उपक्रमाचे स्थानिक परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.

dapoli news, Diwali Celebration, Maharashtra News, Panchanadi, ratnagiri news, Shantaram Jadhav, Social Initiative, Sunandan Bhave, Tribal Welfare, Velvi Kalanagar

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *