भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाची नूतन प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

रत्नागिरीचे तरुण कार्यकर्ते अद्वैत कुलकर्णी यांची युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार, तसेच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व युवा मोर्चाचे प्रभारी सुनील राणे आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या मान्यतेने या नवीन प्रदेश पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली.

प्रदेश पातळीवर अद्वैत कुलकर्णी यांच्यासारख्या तरुण चेहऱ्याला महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याने आगामी काळात तळागाळातील युवकांपर्यंत पक्षाचे विचार प्रभावीपणे पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.

रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णराज महाडिक आणि सुनील राणे यांनी ही नवी कार्यकारिणी तयार केली आहे.

या सर्व नियुक्त्यांमुळे आगामी काळात राज्यातील भाजपची युवा संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात येत आहे.