रत्नागिरी : केंद्र सरकारने आणलेले तीन्ही कृषी कायदे शेतकरी व शेतीवर अलंबून असणार्याना उध्वस्त करणारे आहेत.

हे मोदींचे तुगलकी फरमान असून शेतकर्याना अदानी व अंबानीचे गुलाम बनवण्यासाठी केलेले कायदे आहेत, अशी घाणाघाती टीका काँग्रेसचे नेते व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांनी काँग्रेस भवन येथे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमात केली.

केंद्र सरकारच्या नियतमध्येच खोट आहे त्यामुळे शेतकर्यांना विश्वासात न घेता हे कायदे तयार केले. काँग्रेस पक्षाची व काँग्रेसचे राष्ट्रीय नेते सन्मानिय राहुलजी गांधी यांची भूमिका स्पष्ट आहे, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कायदे केले जात असतील तर त्यांना अपेक्षित असलेली सुधारणा करावी.

उद्योगपतींना नफा कमवून देणारे कायदे कराल तर काँग्रेस अशा जनविरोधी कायद्यांचा विरोध करणार. हे तीन्ही कायदे रद्द झालेच पाहीजेत. या आंदोलनाच्या शेवटच्या क्षणा पर्यंत काँग्रेस पक्ष शेतकर्याबरोबर ठाम पणे उभी राहील असे प्रतिपादन हारीस शेकासन यांनी केले.