रत्नागिरी : रत्नागिरीत २६ व्या राज्यस्तरीय कबड्डी दिन सोहळ्याचे आयोजन; पालकमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कारांचे होणार वितरण स्वर्गीय बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त आणि २६ व्या कबड्डी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने बुधवार, १५ जुलै २०२६ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरीतील माळनाका येथील देसाई बँक्वेट हॉल, विवेक हॉटेल येथे दुपारी ३ ते सायंकाळी ८ या वेळेत हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याला जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि पालकमंत्री उदय सामंत तसेच सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार मुख्य उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते विविध राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष गजानन कीर्तीकर, आमदार भाई जगताप, आमदार किरण उर्फ भैय्या सामंत, असोसिएशनचे प्र. सहकार्यवाह माधव गायकवाड, खजिनदार मंगल पांडे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह नितीन बांद्रे, तालुका हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष वैभव पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या राज्यस्तरीय सोहळ्यात क्रीडा क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या विविध व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये सांगलीचे दिनकर पाटील आणि पुण्याच्या शकुंतला खटावकर यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरव केला जाणार आहे. क्रीडा पत्रकारितेतील योगदानासाठी पत्रकार मंगेश वरवडेकर आणि अल्ताफ कडकाले यांना ‘ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.
तसेच रत्नागिरीतील सदानंद जोशी यांना कृतज्ञता पुरस्कार, सुरज राठोड यांना उदयोन्मुख पुरस्कार आणि विलास सावंत यांना उत्कृष्ट पंच म्हणून गौरविण्यात येणार आहे. यासोबतच आत्माराम घेगडे, बंडू कांबळे, भरत मुळे, गिरीश नाईक, दत्तात्रय शिंफी, वत्केश राऊत, खंडबाराव नाईक, प्रकाश पाटील, सय्यद अजगर अली पटेल आणि विलास सावंत यांना ज्येष्ठ कार्यकर्ते पुरस्कार प्रदान केला जाईल.
इतर पुरस्कारांमध्ये दीपक कांढत्यांवकर, शिविरंकर कापसे आणि अरुणा गावडे यांना श्रमयोगी कार्यकर्ता पुरस्कार, तर निवृत्ती देसाई, सोपान काकडे, सदानंद जोशी आणि अभिजित राणे यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तसेच नारायण गायकवाड आणि सुहास कदम यांना श्रेष्ठ पुरस्कार, तर सौरभ राऊत आणि यामिका पुजारी यांना सर्वोत्कृष्ट चढाईपटू पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
उत्कृष्ट कबड्डीपटू पुरस्कार शिवम पठारे आणि निकिता पडवळ यांना, तर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्वाचा गौरव प्रसाद दिलीप आणि सेरेना म्हस्कर यांना दिला जाणार आहे. ज्येष्ठ पंच गटात प्रथश मोरे, रवींद्र साड, अरुण पवार, अनिल शेजवळ, सूर्यकांत मुटके, वाल्मिक बागुल, मधुकर साळुंखे, हिरामण भोईर, बाळकृष्ण कडूस आणि रामदास गोळे यांना गौरविण्यात येईल. ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार सुरेश मोरे, शशिकांत कोरगावकर, रवींद्र लवेकर, तुळसीदास रोकडे, ब्रह्मनाथ मेंगडे, सुदाम जोगदंड, मदन गायकवाड आणि अलका कारखानीस यांना देण्यात येणार आहे.
उदयोन्मुख कबड्डीपटू शिष्यवृत्ती पुरस्कार किशोर गटात सुरज राठोड, प्रशांत अकीगे, ध्रुव डोंगरे, किशोरी गटात आरती खांडेकर, सेजल काकाडे, ज्ञानेश्वरी ढवण, कुमार गटात शुभम बिटके, जीतसिंग सैनी, अतुल जाधव, तर कुमारी गटात संजना भोईर, वैभवी जाधव आणि सानिका पाटील यांना दिला जाईल. विशेष शिष्यवृत्तीसाठी दिपराज कांबळे आणि मैत्री इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.
या भव्य राज्यस्तरीय सोहळ्याचे नियोजन पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, यामुळे जिल्ह्यातील कबड्डी खेळाला मोठी चालना मिळणार आहे, असा विश्वास रत्नागिरी तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी व्यक्त केला असून क्रीडा रसिक आणि मान्यवरांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

