दापोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दापोलीतील नॅशनल हायस्कूलची विद्यार्थिनी तहरीम हसरत सौतिरकर हिने घवघवीत यश संपादन केले आहे.
तिने या परीक्षेत तालुका गुणवत्ता यादीत तेरावे तर जिल्हा गुणवत्ता यादीत ७७ वे स्थान पटकावत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
या उत्तम कामगिरीबद्दल संस्था आणि प्रशालेच्या वतीने तिचा विशेष सन्मान करण्यात आला.
या परीक्षेत तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक रिजवान मणियार, रियाज अहमद खान आणि सलमान मोमीन यांच्यासह यशस्वी विद्यार्थिनी तहरीमचे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नजीर पठाण, गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन लियाकत रखांगे, सचिव इकबाल परकार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, कॉलेज समितीचे अध्यक्ष आरिफ मेमन, सदस्य नाझीम काझी, हमीद बांगी, मुख्याध्यापक अय्युब मुल्ला तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी अभिनंदन केले आहे.

